November 21, 2024 11:11 AM November 21, 2024 11:11 AM

views 16

भारत आणि गयाना यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी १० करारांवर स्वाक्षरी

भारत आणि गयाना यांनी आरोग्य, हायड्रोकार्बन, कृषी आणि संबंधित क्षेत्रांसह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दहा करारांवर स्वाक्षरी केली आहे. वैद्यकीय उत्पादने, जनऔषधी योजना, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, गयानामध्ये UPI सारखी प्रणाली तैनात करणे आणि प्रसार भारती आणि नॅशनल कम्युनिकेशन नेटवर्क, गयाना यांच्यात प्रसारण क्षेत्रात सहकार्य आणि सहकार्य यावर सामंजस्य करार करण्यात आले.

November 19, 2024 1:42 PM November 19, 2024 1:42 PM

views 7

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरियो इथे जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान त्यांचे चिनीचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अलिकडेच विस्कळीत झालेल्या भारत-चीन सीमेवरच्या प्रगतीविषयी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांच्या पुढच्या टप्प्याविषयी तसंच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.

November 19, 2024 9:46 AM November 19, 2024 9:46 AM

views 13

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्य सामना आज जपानबरोबर

बिहारमधील राजगीर इथं सुरु असलेल्या आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत साखळीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं जपानवर ३-० अशी मात केली. या स्पर्धेतील उपांत्य फारीचा सामना आज याच जपान संघाबरोबर खेळला जाणार आहे. दिपिकानं या स्पर्धेत सर्वाधिक गोल केले असून कालच्या सामन्यातही तीनं २ गोल नोंदवले तर उपकर्णधार नवनीत कौरने ३७ व्या मिनिटाला गोल केला. अनेक खेळांमध्ये पाच विजयांसह, भारतीय संघ सर्वाधिक १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनपेक्षा १२ गुणांसह पुढे आहे.

November 18, 2024 1:36 PM November 18, 2024 1:36 PM

views 5

क्रिकेट : कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा येत्या २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेचा पहिला सामना खेळू शकणार नाही. ही कसोटी सामन्यांची स्पर्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. रोहित व्यतिरिक्त शुभमन गिल हा देखील अंगठ्याच्या दुखापतीमुळेही पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. रोहित आणि शुभमन ऐवजी या सामन्यात के एल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन खेळणार आहेत.

November 14, 2024 7:58 PM November 14, 2024 7:58 PM

views 13

महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर १३-० असा विजय

बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर १३-० असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत ५ गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेमसियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारताचा यानंतरचा सामना चीनशी होणार आहे.  

November 12, 2024 8:28 AM November 12, 2024 8:28 AM

views 3

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं बिहारमध्ये उद्घाटन, भारताची विजयी सलामी

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं उद्घाटन काल बिहारमध्ये राजगीर इथं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते झालं. कालच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं मलेशियावर 4-0 असा विजय मिळवला. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. अन्य एका सामन्यात चीननं थायलंडच्या संघावर 15-0 असा दणदणीत विजय मिळवला.

November 11, 2024 10:48 AM November 11, 2024 10:48 AM

views 31

दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेनं काल गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारतानं केलेल्या 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 19 षटकांतच 7 गडी गमावून 128 धावा पूर्ण केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 47 धावांवर नाबाद राहत लक्षणीय खेळी खेळली. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. तर जेराल्ड कोएत्झीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. भारतातर्फे वरुण चक्रवर्तीनं 5 बळी घेतले. तत्पूर्वी, भारतानं निर्धारित 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या. हार्दिक पंड्यान...

November 10, 2024 8:09 PM November 10, 2024 8:09 PM

views 31

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना गकेबेरा इथं सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला.  भारताच्या फलंदाजीची सुरुवात मात्र खराब झाली. संघाच्या केवळ ५ धावाच झाल्या असताना भारताचे दोन्ही सलामीवर तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादवही केवळ ४ धावा करून बाद झाला.

November 9, 2024 2:30 PM November 9, 2024 2:30 PM

views 29

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ६१ धावांनी जिंकला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

November 8, 2024 10:05 AM November 8, 2024 10:05 AM

views 12

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा पहिला टी 20 क्रिकेट सामना आज डर्बनमध्ये

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या चार टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज रात्री डर्बनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सामन्याला सुरूवात होईल.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला परदेशी भूमीवर उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी आहे. या संघानं घरच्या मैदनावर बांग्लादेश विरूद्धची टी-20 मालिका 3-0 नं जिंकली होती. सध्या भारतीय संघ टी-20 संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर तर दक्षिण अफ्रिका सहाव्या स्थानावर आहे.