December 2, 2024 10:42 AM December 2, 2024 10:42 AM

views 7

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

ओमान मधील मस्कत इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव करत अ गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे.

December 1, 2024 8:56 AM December 1, 2024 8:56 AM

views 8

बॅडमिंटनमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सेननं जपानच्या शोगो ओगावाचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. अंतिम सामन्यात लक्ष सेनची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी होईल. दरम्यान भारताच्या पी व्ही सिंधूनंही महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिनं भारताच्याच उन्नती हुडाचा २१-१२, २१-९ असा पराभव केला. अन्य एका स्पर्धेत, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीनंही महिला दुहेरीच्या अंतिम फे...

November 29, 2024 1:31 PM November 29, 2024 1:31 PM

views 10

हॉकी : पुरुषांच्या कनिष्ठ आशियाई स्पर्धेत भारताचा जपानवर ३-२ असा विजय

ओमानमध्ये मस्कत इथं पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानवर ३-२ अशा फरकानं विजय मिळवला. भारताचा अ गटातला सलग दुसरा विजय आहे. भारताचा पुढचा सामना उद्या तैवानशी होणार असून, रविवारी अंतिम सामन्यात भारताची लढत कोरियासोबत होणार आहे.

November 27, 2024 9:57 AM November 27, 2024 9:57 AM

views 13

भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं मंत्री राजीव रंजन सिंह यांचं प्रतिपादन

भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलं. दिल्लीसह देशभरात काल राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा करण्यात आला. २०३० सालापर्यंत देशातलं पशुधन रोगमुक्त होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून रंजन म्हणाले की, पशुपालन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लावला आहे. श्वेत क्रांतीचे पितामह म्हणवल्या जाणाऱ्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २६ नोव्हेंबर...

November 27, 2024 9:49 AM November 27, 2024 9:49 AM

views 16

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार झाला आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीमधला ३५ टक्क्यांहून अधिक वाटा रशियाचा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल दिली. नवी दिल्लीत काल फिपी तेल आणि वायू पुरस्कार सोहळ्यात पुरी बोलत होते. गेल्या दोन वर्षात देशाच्या तेलाच्या स्रोतांमध्ये झालेल्या बदलावर प्रकाश टाकत, फेब्रुवारी २०२२ पासून रशियाकडून होणाऱ्या आयातीत सातत्यपूर्ण वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

November 27, 2024 9:39 AM November 27, 2024 9:39 AM

views 6

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, भारताचं बांग्लादेशला आवाहन

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी असं आवाहन भारतानं बांग्लादेश सरकारला केलं आहे. अल्पसंख्याकांच्या मुलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बांग्लादेश संमिलीत सनातन जागरण मंच चे प्रवक्ते प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काल त्यांना जामीन नाकारण्यात आला. या घटनेबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभु दास यांच्या सुटकेची मागणी करत चटगाव न्यायालयाच्या आवारात जमलेल्या इस्कॉन पुंडर...

November 25, 2024 1:46 PM November 25, 2024 1:46 PM

views 24

भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या. भारताकडून जसप्रित बुमराह,मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर वॉशिग्टन सुंदर यानं दोन गडी बाद केले.   काल विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४८७ धावा केल्या. त्यानंतर भारतानं डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी...

November 22, 2024 8:03 PM November 22, 2024 8:03 PM

views 12

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर समाप्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डावही अवघ्या १५० धावांत गडगडला. मात्र भारतीय संघ अद्यापही ८३ धावांनी आघाडीवर आहे. भारतीय संघाच्या डावाला आकार देण्यात नवोदित नितीश कुमार रेड्डीनं मोलाची भूमिका बजावली. ४१ धावांचं योगदान देणाऱ्या नितीश क...

November 21, 2024 8:01 PM November 21, 2024 8:01 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गयानाकडून ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना  या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊस मध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली...

November 21, 2024 3:50 PM November 21, 2024 3:50 PM

views 17

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून सुरुवात

क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळू शकत नसल्यामुळे जसप्रीत बुमराह हा नेतृत्व करणार आहे. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षण मोर्ने मार्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वगुणाची वार्ताहर परिषदेत प्रशंसा केली. उद्याचा पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटां...