December 9, 2024 1:39 PM December 9, 2024 1:39 PM

views 6

नॉर्वे आणि भारत यांच्यात स्टार्टअप पूल सुरू करण्याचा मंत्री पियुष गोयल यांचा प्रस्ताव

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित भारत-नॉर्वे व्यावसायिक चर्चेला संबोधित करताना गोयल बोलत होते. नुकताच भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना  यांच्यात नुकताच व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार करण्यात आला. त्यात युरोपियन महासं...

December 9, 2024 10:05 AM December 9, 2024 10:05 AM

views 5

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारताला ५५ पदकं

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत भारताला 55 पदकं मिळाली. यामध्ये 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकं पटकावली. केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करुन च्याचं यश देशासाठी प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. या स्पर्धेत 62 पदकं मिळवत इराणनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं.

December 8, 2024 8:23 PM December 8, 2024 8:23 PM

views 3

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता

बांगलादेशाच्या भारताबरोबरच्या व्यापारात आलेल्या मंदीवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटलं आहे. अशी  बातमी  स्थानिक वृत्त संस्थेनं दिली आहे. व्यापार मंदीची समस्या सौहार्दपुर्णतेनं सोडवली जाईल , असंही हुसेन यांनी सांगितलं. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारात गेल्या २-३ महिन्यात बरीच घाट झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रि  उद्या बांगलादेशात येणार असून त्यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि परस्पर चिंतेच्या विषयांवर...

December 8, 2024 8:47 PM December 8, 2024 8:47 PM

views 9

U१९ आशिया चषक : भारताचा ५९ धावांनी पराभव होऊन बांग्लादेश विजयी

दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन चेंडूत केवळ १३९ धावा करून तंबूत परतला.   भारताच्या वतीनं कर्णधार मोहम्मद आमन यानं सर्वाधिक २६ धावा केल्या. अंतिम सामन्यात भारताचे ३ तर संपूर्ण स्पर्धेत एकूण १० गडी बाद केलेल्या बांग्लादेशाचा गोल...

December 8, 2024 3:41 PM December 8, 2024 3:41 PM

views 9

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण संघ १९८ धावांतच तंबूत धाडला. बांग्लादेशाच्या वतीनं मोहम्मद रिझान यानं सर्वाधिक ४७ धावा केल्या. भारताच्या युद्धजीत, चेतन आणि हार्दिक यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारता...

December 8, 2024 3:14 PM December 8, 2024 3:14 PM

views 9

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा केला पुरवठा

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट या धोरणांतर्गत भारत मानवतावादी मदत करत आहे, असं जयस्वाल म्हणाले.

December 8, 2024 3:25 PM December 8, 2024 3:25 PM

views 23

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला.   अ गटात झालेल्या इतर सामन्यात मलेशियानं थायलंडला ३-० असं पराभूत केलं. ब- गटातल्या सामन्यात जपाननं श्रीलंकेचा १५-० नं पराभव केला. पुढच्या ...

December 7, 2024 11:22 AM December 7, 2024 11:22 AM

views 12

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना सीरियाचा प्रवास टाळण्याचा दिला सल्ला

पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळण्याचा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

December 4, 2024 8:21 PM December 4, 2024 8:21 PM

views 27

पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतपदासाठी भारताची पाकिस्तानशी लढत

ओमान इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं मलेशियाला ३-१ ने नमवत अंतिम फेरी गाठली होती. तर पाकिस्तानी संघानं जपानच्या संघावर ४-२ असा विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे. या स्पर्धेचं विजेतेपद म्हणजे भारतीय संघासाठी विजयाची हॅटट्रिक असणार आहे.

December 2, 2024 1:25 PM December 2, 2024 1:25 PM

views 3

प्लॅस्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज : भारत

जगभरात प्लॅस्टिक प्रदूषणाचं आव्हान गंभीर होत असून त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थांवर विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्थांवर होत आहे. त्यामुळं प्लॅस्टिक प्रदूषण आणि शाश्वत विकास यात संतुलन राखण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी परस्परविश्वास आणि सामंजस्यानं उपाययोजना करण्याचं आवाहन भारतानं दक्षिण कोरियात बुसान इथं आंतरसरकारी वाटाघाटी समितीच्या पाचव्या सत्राच्या अंतिम सभेत केलं आहे. प्लॅस्टिक पॉलिमरच्या उत्पादनाचं नियमन करण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांना पाठिंबा देण्यास आपण असमर्थ असल्याचं भारतानं स्...