December 22, 2024 1:59 PM December 22, 2024 1:59 PM

views 6

भारताकडे पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद

भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल. भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नववी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

December 21, 2024 1:48 PM December 21, 2024 1:48 PM

views 8

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या ३५० दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल 350 दशलक्ष डॉलर्सचा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला. बहुस्तरीय आणि एकात्मिक मालसाठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे. केंद्र सरकारच्या विविध मालसाठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे.

December 20, 2024 11:14 AM December 20, 2024 11:14 AM

views 11

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्नास धावा काढून विक्रम केला, ती सामनावीर ठरली. उत्तरादाखल वेस्टइंडीज संघ 20 षटकात 9 बाद 157 धावाच करु शकला. स्मृती मंधनाला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. उभय संघांमध्ये पन्नास षटकांची मालिका परवा 22 त...

December 19, 2024 10:01 AM December 19, 2024 10:01 AM

views 36

महिला क्रिकेट : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा सामना नवी मुंबईत होणार

भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकून बरोबरी केली आहे.

December 19, 2024 9:35 AM December 19, 2024 9:35 AM

views 11

भारत-चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची बैठक यशस्वी

भारत आणि चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची 23 वी बैठक काल झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधल्या सीमा भागातल्या प्रश्नांवर योग्य, व्यवहार्य आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल असा पर्याय शोधून शांततेसाठी प्रयत्न करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजकीय दृष्टीकोनातून चर्चा होणं महत्त्वाचं आहे या मुद्द्याचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रिय आणि जागतिक मुद्द...

December 18, 2024 1:50 PM December 18, 2024 1:50 PM

views 19

बॉर्डर-गावस्कर चषक : भारत – ऑस्ट्रेलियात यांच्यातला तिसरा सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.   आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत ८ धावांची भर घालून २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा करत ७ बाद ८९ धावा झाल्या असताना डाव घोषित केला, आणि पहिल्या डावातल्या १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान ठेवलं.   मात्र भारताच्या दुसऱ्या डावात केवळ २ षटकं आणि १ चेंडूचा ...

December 18, 2024 11:10 AM December 18, 2024 11:10 AM

views 10

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १६० धावाचं लक्ष्य ठेवलं होतं.

December 17, 2024 2:57 PM December 17, 2024 2:57 PM

views 11

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी या यशाचं  मेकिंग भारत स्टोरी  या शब्दांत कौतुक केलं. उत्पादन आधारित परतावा   धोरणाच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ७० ते ७५ टक्के निर्यातीचं ठरवलेलं  उद्दिष्ट  यामुळे अगोदरच गाठलं गेलं आहे...

December 16, 2024 3:35 PM December 16, 2024 3:35 PM

views 8

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि के एल राहुल खेळत असून पावसामुळे खेळाचा काही वेळ वाया गेला. 

December 16, 2024 7:51 PM December 16, 2024 7:51 PM

views 8

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुहेरी कर आकारणी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले. तसंच, श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले. जाफना आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापाठांमधल्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अर्थसहाय्य देण्याची योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर हे करार करण...