January 2, 2025 1:42 PM January 2, 2025 1:42 PM

views 2

सन २०२४ मधे देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ

२०२४ या वर्षी देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ झाली असून ती २ कोटी ६० लाखापर्यंत पोहोचली आहे. कोविड काळापूर्वीचा २०१८ मधला २ कोटी ४५ लाखाचा उच्चांक या वर्षात वाहनविक्रीने ओलांडला. वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्य़ाची ऐपत वाढल्याचं हे निदर्शक आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण वाहन उद्योगाला प्रोत्साहन देणारं ठरेल असं मत उद्योगविषयक तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

January 1, 2025 8:19 PM January 1, 2025 8:19 PM

views 9

भारत आणि पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांच्या याद्या सादर

भारत आणि पाकिस्तानने आपापाल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या. उभय देशांमधे अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीनं झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारीत या याद्या सादर केल्या जातात.

December 29, 2024 3:08 PM December 29, 2024 3:08 PM

views 12

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या दोन्ही देशांमध्ये परस्परसंबधातून व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकास यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून, द्विपक्षीय व्यावसायिक व्यापारात दुप्पटीने वाढ झाली. या यशाच्या पायावर भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराची वाटचाल सुरु असून त्यासाठी आतापर्यंत यासाठी १० औपचारिक फेऱ्या आणि चर्चा झाल्या आहेत असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

December 22, 2024 8:23 PM December 22, 2024 8:23 PM

views 11

भारत आणि कुवेत या देशांमध्ये विविध करार

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह, युवराज शेख सबाह अल खालेद अल हमाद अल मुबारक अल सबाह आणि कुवेतचे प्रधानमंत्री अहमद अल अब्दुल्ला अल सबाह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण, सांस्कृतिक आदानप्रदान, क्रीडा याविषयीचे सामंजस्य करार आणि कुवेतला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं सदस्यत्व देण्याविषयी करारांवर  स्वाक्षऱ्...

December 22, 2024 8:26 PM December 22, 2024 8:26 PM

views 26

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २११ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.    वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.     विजयासाठी ३१५ धाव...

December 22, 2024 7:32 PM December 22, 2024 7:32 PM

views 15

भारत आणि कुवेतमध्ये बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि कुवेतमध्ये इतिहास, संस्कृती आणि परस्परांबद्दलचा आदर असे बहुआयामी संबंध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कुवेतमधल्या एका खाजगी वृत्तसंस्थेला मुलाखतीत ते बोलत होते. ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध असल्याचं ते म्हणाले. व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. औषधनिर्माण, आरोग्य, तंत्रज्ञान, डिजिटल, नवोन्मेष आणि वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्...

December 22, 2024 7:16 PM December 22, 2024 7:16 PM

views 12

पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्टइंडिजला ३१५ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढे ३१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रतिका रावळ ४०, हार्लिंग देओल ४४, हरमनप्रीत कौर ३४, तर रिचा घोषनं १३ चेंडूत २६ धावांचं योगदान दिलं.  वेस्ट इंडिजतर्फे जैदा जैम्सनं ५ बळी टिपले.  

December 22, 2024 8:12 PM December 22, 2024 8:12 PM

views 4

भारताला १९ वर्षाखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत विजेतेपद

१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशाला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं आहे. भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला.    मलेशियात क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात, बांग्लादेशानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. गोंगाडी त्रिशा हिनं ४७ चेंडूत ५२ धावा केल्या.  भारताच्या आव्हानाचा पाठलाग...

December 22, 2024 1:39 PM December 22, 2024 1:39 PM

views 16

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारताकडून निषेध

जर्मनीत मॅग्डेबर्ग इथं झालेल्या भीषण हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात पाच लोक ठार तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींमध्ये सात भारतीयांचाही समावेश होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात, नाताळच्या बाजारात झालेला हा हल्ला भीषण आणि माथेफिरू असल्याचं म्हटलं आहे. जखमी भारतीय नागरिकांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. जर्मनीतील भारतीय दुतावास या हल्ल्यात झालेल्या जखमी झालेल्यांच्या संपर्...

December 22, 2024 1:59 PM December 22, 2024 1:59 PM

views 17

भारत-कुवैत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याशी स्वतंत्र बैठका घेणार आहेत. कुवेतच्या प्रधानमंत्र्यांशी ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे.    काल प्रधानमंत्र्यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात भारतीय समुदाया...