January 15, 2025 9:30 AM January 15, 2025 9:30 AM

views 8

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ विजयी

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला. तर अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 गुणांनी मात केली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आलं. पबरी साबरला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

January 9, 2025 3:12 PM January 9, 2025 3:12 PM

views 18

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस.प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर २१-१२,१७-२१,२१-१५ असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.   मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्यून को आणि हाय वोन एओम यांचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशित सूर्या आणि अम...

January 9, 2025 10:37 AM January 9, 2025 10:37 AM

views 27

भारत आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याची दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांनी काल दुबईत द्विपक्षीय मुद्द्यांवर विविध घडामोडींवर चर्चा केली. अफगाणी नागरिकांशी भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे दृढ संबंध या चर्चेत अधोरेखित करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.   अफगाणी नागरिकांच्या विकासासाठी तातडीच्या गरजांबाबत भारताची तयारी असल्याचं अफगाणिस्तानकडे कळवण्यात आलं आहे. भारतानं यापूर्वी मानवी भावनेतून अफगाणिस्तानला पन्नास...

January 8, 2025 8:25 PM January 8, 2025 8:25 PM

views 2

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली.  या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रकल्प तसंच संरक्षण सहकार्य याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली. भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य, सागरी सुरक्षा भागीदारीसाठी एकत्र काम करण्याबाबत वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली.  यावेळी संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत ही दोघांमध्ये चर्चा झाली, मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते गोवा आणि मुंबईलाह...

January 6, 2025 8:00 PM January 6, 2025 8:00 PM

views 17

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताकडून निषेध

पाकिस्तानने अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी  आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तांची दखल भारत सरकारने घेतली असून विशेषतः महिला आणि मुलंही बळी गेल्याचा भारत निषेध करत आहे. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजाऱ्यांना दोष देणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याची टीका भारतानं केली आहे.

January 5, 2025 1:11 PM January 5, 2025 1:11 PM

views 7

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांगलादेशातल्या  तुरुंगात होते.

January 5, 2025 9:31 AM January 5, 2025 9:31 AM

views 14

बॉर्डर-गावसकर चषक : क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 6 बळी घेतले. भारताने कालच्या 6 बाद 129 धावांवरून आपला डाव सुरू केल्यानंतर भारताने केवळ 28 धावांची भर घातली. 

January 5, 2025 12:10 PM January 5, 2025 12:10 PM

views 5

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवस भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा  करणार आहेत. अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधावर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महासागर  क्षेत्रात  चीनच्या हालचालींविषयीचा मुद्दा त्यात असेल. सुलिवान आयआयटी दिल्ली मधे भारतीय उद्योजकांशी चर्चा करतील. सुलिवान यांचा हिंद- प्रशांत महासागर क्षेत्रातला हा अखेरचा औपचारिक दौरा आहे. 

January 3, 2025 8:15 PM January 3, 2025 8:15 PM

views 10

‘भारत’ जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश – मंत्री पियुष गोयल

११० हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल  आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना म्हणाले. देशभरातल्या स्टार्टअप पैकी ४३ टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहिती गोयल यांनी यावेळी दिली.  जगभरात भू राजकीय  ताणतणाव असूनही भारताची वाढती निर्यात लवकरच ८०० बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याचा टप्पा गाठेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. 

January 3, 2025 1:43 PM January 3, 2025 1:43 PM

views 10

बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव १८५ धावांमधे आटोपला

बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिल्या डाव १८५ धावांवर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत ने सर्वाधिक ४० धावा केल्या तर रवींद्र जाडेजा ने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांड ने ३१ धावात ४ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून दिवसअखेर १ बाद ९ धावा झाल्या आहेत.