January 29, 2025 10:43 AM January 29, 2025 10:43 AM

views 8

श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध

डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून औपचारिकरित्या निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानंही श्रीलंकेच्या सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे.

January 29, 2025 10:35 AM January 29, 2025 10:35 AM

views 19

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याच्या अहवालाचं भारताकडून खंडन

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याचा कॅनडा सरकारच्या अहवालाचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं आहे. उलट कॅनडा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका भारतानं केली आहे. अशा हस्तक्षेपामुळे अनधिकृत स्थलांतर आणि गुन्हेगारी प्रवृतीला खतपाणी घालतात, या अहवालातील भारताविषयीचे आक्षेप फेटाळून लावले तसंच बेकायदा स्थलांतरास सक्षम करणारी यंत्रणा यापुढे स्वीकारली जाणार नाही असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

January 29, 2025 10:27 AM January 29, 2025 10:27 AM

views 11

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा २६ धावांनी पराभव

भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शाह मैदानावर झालेल्या तिसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत नऊ गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-1 नं आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.

January 28, 2025 12:40 PM January 28, 2025 12:40 PM

views 9

सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत-ओमानमध्ये चर्चा

व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी ओमानसोबत सर्वंकष आर्थिक भागिदारी कराराच्या चर्चा पुढे नेण्याच्या मुद्द्यावर भारत आणि ओमानमध्ये चर्चा झाली. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि ओमानचे वाणिज्य मंत्री क्वायस बिन मोहम्मद अल युसुफ यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांच्या संयुक्त आयोगाच्या बैठकीत या करारावर आणखी विस्ताराने चर्चा होईल, अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.

January 28, 2025 3:00 PM January 28, 2025 3:00 PM

views 12

भारत आणि इंडोनेशियाचे नौदल प्रमुख यांच्यात द्वीपक्षीय बैठक

भारत आणि इंडोनेशियाच्या नौदल प्रमुखांमध्ये काल झालेल्या द्वीपक्षीय संवादात उभय देशांदरम्यान सागरी सहकार्य दृढ करणे आणि द्वीपक्षीय संबंध मजबूत कऱण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इंडोनेशियाचे ऍडमिरल मुहम्मद अली यांच्या दिल्लीत काल सागरी शक्ती सरावाला पुढे नेणे, परिचालन सहकार्य मजबूत करणे आणि समुद्री चाचेगिरी, बेकायदेशीर कारवायांसारख्या सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करण्याविषयी चर्चा झाली. अॅडमिरल अली यांनी ब्रह्मोस एअरोस्पेसलाही भे...

January 28, 2025 10:20 AM January 28, 2025 10:20 AM

views 13

भारत-नेपाळ यांच्यात संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक

भुकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल भारत-नेपाळ यांच्यादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची पाचवी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहाय्याने भूकंपोत्तर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व उत्तर भागाचे अतिरिक्त सचिव मुनू महावर यांनी केलं तर नेपाळच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव पद्मकुमार मैनाली यांनी केलं. 2015 च्या विनाशकारी भुकंपानंतर, भारताने नेपाळला अडीचश...

January 23, 2025 8:42 PM January 23, 2025 8:42 PM

views 13

U19WC : भारताचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय

एकोणीस वर्षांखालच्या महिला क्रिकेट टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत, आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय मिळवला. सुरुवातीला, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून ११८ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या २४ चेंडूत अवघ्या १२ धावात त्यांच्या ५ फलंदाज तंबूत परतल्या. २० षटकात ९ गडी गमावून  त्यांना फक्त ५८ धावाच करता आल्या. 

January 23, 2025 9:55 AM January 23, 2025 9:55 AM

views 4

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा विजय

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या, भारतानं हे लक्ष्य तेराव्या षटकातच तीन गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला, त्यानं केवळ 20 चेंडूत पन्नास धावा ठोकल्या. दुसरा सामना चेन्नई इथं शनिवारी होणार आहे.

January 22, 2025 8:28 PM January 22, 2025 8:28 PM

views 9

इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या १४ व्या षटकात ६ बाद ९७ धावा झाल्या होत्या.  सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगनं फिल सॉल्टला शून्यावर तंबूत धाडलं. तर तिसऱ्या षटकात त्यानं बेन डकेटला ४ धावांवर बाद केलं. त्यानंतर कर्णधार जोस बटलरनं इंग्लंडचा डाव सावरला. भारतीय संघाचं नेतृत्व ...

January 22, 2025 8:26 PM January 22, 2025 8:26 PM

views 2

खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांचा क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांना आज नवी दिल्ली इथं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. दोन्ही संघांमधल्या खेळाडूंचं मांडवीय यांनी कौतुक केलं. भारताच्या पारंपरिक खेळाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिल्याबद्दल दोन्ही संघांचं त्यांनी अभिनंदन केलं. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तसंच २०३६ च्या ऑलिंपिक स्पर्धेत खो खो चा समावेश करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील, असं मांडवीय यावेळी म्हणाले.