February 18, 2025 12:52 PM February 18, 2025 12:52 PM

views 17

भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचं उद्घाटन

भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कतारचे वाणिज्यमंत्री शेख फैज़ल बिन थानी अल थानी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी भारत – कतार दरम्यान दोन समझोता करार झाले.

February 18, 2025 1:16 PM February 18, 2025 1:16 PM

views 9

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर

कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करत आहेत. शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. शेख तमीम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रपती भवनात पाहुण्याना पारंपरिक मानवंदना देण्यात आली.    शेख तमीम यांच्यासोबत उच्चपदस्थ शिष्टमंडळ आलं असून व्यापार, गुंतवणूक, उर्जा, आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबद्दल या ...

February 14, 2025 7:33 PM February 14, 2025 7:33 PM

views 4

लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञानातली भागिदारी बळकट करण्यावर भारत-अमेरिका यांच्यात सहमती

 यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.    संरक्षण भागीदारीसाठी नव्या दहा वर्षांच्या आराखड्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा भारत आणि अमेरिकेनं केली आहे. २०२५ ते २०३५ या दशकभरासाठी असणाऱ्या या आराखड्याचा हेतू दोन्ही देशातले संरक्षण संबंध दृढ करणं हा आह...

February 12, 2025 9:53 AM February 12, 2025 9:53 AM

views 25

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अंतिम सामना आज होणार

भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजयासह मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल.

February 12, 2025 9:21 AM February 12, 2025 9:21 AM

views 19

भारत आणि फ्रान्समध्ये व्यवसायाची भूमिका वाढत आहे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाची भूमिकाही वाढत आहे, असं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल 14 व्या भारत-फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्रे असून दोन्ही देशातील सहकार्यामुळे मेक इन इंडिया धोरणालाही लाभ होईल असं डॉ. एस. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.

February 10, 2025 1:54 PM February 10, 2025 1:54 PM

views 17

भारत आणि इंग्लंड क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

  भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना काल भारताने ४ गडी राखून जिंकला. यासह भारताने मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडचं ३०५ धावांचं आव्हान भारतानं ४४ षटकं आणि ३ चेंडूत पार केलं.   कर्णधार रोहित शर्मानं शतकी खेळी करत भारतीय संघाचा विजय सोपा केला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ६० धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यरनं ४४ आणि अक्सर पटेलनं नाबाद ४१ धावा केल्या.   त्याआधी इंग्लंडचा डाव सामन्यात...

February 9, 2025 1:39 PM February 9, 2025 1:39 PM

views 13

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचा सामना रशिया सोबत

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे.   प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.

February 3, 2025 11:28 AM February 3, 2025 11:28 AM

views 17

पुरुषांच्या 20 षटकांच्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना काल भारतीय संघाने दीडशे धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत, 97 धावांवर बाद झाला.

February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 11

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख ९५ हजार कोटी रुपयावर

जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.

January 31, 2025 3:42 PM January 31, 2025 3:42 PM

views 12

T20 क्रिकेट : पुण्यात भारत आणि इंग्लड यांच्यात मालिकेतला चौथा सामना

भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं दोन तर इंग्लंडनं एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा, तर बरोबरी साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. या मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना येत्या २ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे.