February 24, 2025 8:56 AM February 24, 2025 8:56 AM

views 13

भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद २४१ धावा केल्या तर प्रत्युत्तर दाखल ४५ चेंडू राखत विराट कोहलीच्या संयमी शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हे उद्दिष्ट केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवनं तीन तर हार्दिक पांड्यानं दोन बळी घेतले. या सामन्याद्वारे विराट कोहलीने १४ हजार धावांचा टप्पा सर्वात कमी...

February 23, 2025 1:37 PM February 23, 2025 1:37 PM

views 7

भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा

भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे. या संदर्भात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. १३ जानेवारी २०२२मध्ये या संदर्भातल्या बैठका सुरू झाल्या होत्या. डिसेंबर २०२३पर्यंत या बैठकांचे १३ टप्पे पूर्ण झाल्यानंतर मे २०२४ मध्ये ब्रिटनच्या निवडणुकांमुळे १४वा टप्पा प्रलंबित होता. या टप्प्यातली बैठक उद्यापासून सुरू होईल. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढ...

February 22, 2025 8:17 PM February 22, 2025 8:17 PM

views 7

शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती

शस्त्रबंदी कायम ठेवणं आणि भविष्यात गैरसमज टाळण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहमती झाली आहे. जम्मू - काश्मिरातल्या पूंछमध्ये दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरच्या बैठकीत ही चर्चा झाली. सुमारे ४ वर्षांनंतर अशा प्रकारची बैठक झाली. नुकतीच झालेली चकमक आणि ताबारेषेवर आढळून आलेल्या बॉम्बची पार्श्वभूमी या बैठकीला होती. दोन्ही देशातला तणाव कमी करण्यासाठी विद्यमान संपर्क यंत्रणांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णयही दोन्ही देशांनी घेतला

February 21, 2025 8:22 PM February 21, 2025 8:22 PM

views 19

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी – मंत्री पीयूष गोयल

जपान हा भारताच्या आर्थिक वाढीतला प्रमुख सहयोगी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला ते संबोधित करत होते. साल २००० ते २०२४ या काळात जपानमधून थेट परकीय गुंतवणूक ४३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली आहे. जपान हा भारताच्या परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत असल्याचंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. सध्या १ हजार ४०० हून अधिक जपानी कंपन्या भारतात कार्यरत आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, तसंच दिल्ली, अ...

February 21, 2025 8:13 PM February 21, 2025 8:13 PM

views 6

भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांची कमांडर स्तरावरची फ्लॅग बैठक

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर चाकन द बाग या ठिकाणी आज भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांची कमांडर स्तरावरची फ्लॅग बैठक झाली. दोन्ही देशांचे  वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.    राजौरी, पूंछ आणि जम्मू या जिल्ह्यांमधल्या अलीकडच्या गोळीबाराच्या घटना, स्नायपरचे हल्ले आणि स्फोटकांचा वापराच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा यावेळी भारतीय अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध क...

February 21, 2025 8:09 PM February 21, 2025 8:09 PM

views 5

बंगाल उपसागराच्या आंतर सरकार संघटनेचं अध्यक्षपद भारतानं स्वीकारलं

भारतानं आज बंगाल उपसागराच्या आंतर सरकारी संघटनेचं अध्यक्षपद बांगलादेशाकडून स्वीकारलं. मालदीवमध्ये माले इथं झालेल्या १३व्या प्रशासकीय मंडळ बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. अभिलाक्ष लिखी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय शिष्टमंडळानं  ही अध्यक्षपदाची सूत्रं  स्वीकारली. प्रादेशिक सहकार्याचं  महत्त्व आणि विकसनशील राष्ट्रांच्या हितासाठी इतर देशांसह भारताची महत्त्वाची भूमिका त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

February 21, 2025 2:43 PM February 21, 2025 2:43 PM

views 23

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सामना ब्रिटन सोबत

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान यांचा सामना ब्रिटनच्या लॉईड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या जोडीशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.   भांबरी आणि डोडिग या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मेट पाविच आणि एल साल्वाडोरच्या मार्सेलो या जोडीवर मात केली. या सामन्यात पहिला सेट गमावल्या नंतरही दमदार पुनरागमन करत त्यांनी सामना २-६, ६-३, १०-८ असा जिंकला.

February 20, 2025 8:50 PM February 20, 2025 8:50 PM

views 9

भारत आणि बांगलादेश यांच्यात ५५वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद

भारत आणि बांगलादेश यांच्यातली  ५५ वी महासंचालक स्तरीय सीमा परिषद आज नवी दिल्लीत झाली. भारतातर्फे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंंह चौधरी आणि बांगलादेशच्या बॉर्डर गार्डचे महासंचालक मेजर जनरल मोहम्मद सिद्दीकी यांनी भाग घेतला. या परिषदेत घुसखोरी,  सीमा भागातले गुन्हे, सीमेवर तारेचं कुंपण, तस्करी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सीमाभागातल्या लोकांच्या मानव अधिकाराचं रक्षण आणि सीमेवरील  हिंसाचार कमी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

February 19, 2025 3:27 PM February 19, 2025 3:27 PM

views 5

दहशतवादाविरुद्ध लढण्यात आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना – भारत

दहशतवादाविरुद्ध लढण्यात इस्लामाबाद आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना आहे, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरिश यांनी काल म्हटलं. संयुक्त राष्ट्रांनी सूचिबद्ध केलेल्या २०हून अधिक दहशतवादी संघटनांना आश्रय देणारा पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचं केंद्र आहे. त्यामुळे असा देश जेव्हा दहशतवादाविरुद्ध आघाडीवर असल्याचा दावा करतो, तेव्हा ती एक विडंबना ठरते, असंही ते यावेळी म्हणाले. पाकिस्तानचे उप प्रधानमंत्री इशाक दार यांनी केलेल्या कश्मीरवरच्या वक्तव्या...

February 19, 2025 9:22 AM February 19, 2025 9:22 AM

views 26

भारत आणि कतार यांच्यात लवकरच मुक्त व्यापार करार

भारताचे कतारशी असलेले संबंध अनेक शतकं जूने असून, कतार, पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. भारताच्या दौऱ्यावर असलेले कतारचे आमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या विशेष भोजन समारंभात त्या बोलत होत्या.   दरम्यान, प्रधानमंत्र नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात काल नवी दिल्लीत चर्चा झाली. चर्चेदरम्यान, भारत आणि कतार यांच्यातला व्या...