March 12, 2025 2:50 PM March 12, 2025 2:50 PM
9
मॉरिशस बरोबर भारताचे अनेक सामंजस्य करार
भारत-मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. भारत-मॉरिशसच्या भागीदारीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या संसद भवनाच्या निर्माणात भारत सहाय्य करेल. मॉरिशसमध्ये १०० किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या पाईपच्या आधुनिकीकरणासाठी काम केलं जाईल. सामुदायिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ५०० मिलियन मॉरिशियन रुपये खर्चा...