April 1, 2025 10:43 AM April 1, 2025 10:43 AM

views 14

चीलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

चीलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या बरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे; त्यामध्ये चिलीचे मंत्री, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच भारत आणि चिली दरम्यान सांस्कृतिक सहकार्यासाठी काम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे. चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन इथं मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आह...

March 28, 2025 8:18 PM March 28, 2025 8:18 PM

views 27

भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार

जपानच्या, विकास सहायता कार्यक्रमांतर्गत सहा महत्वाच्या प्रकल्पांसाठी भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार झाले आहेत. नवी दिल्लीत काल भारत आणि जिका अर्थात जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी यांनी या करारांवर सह्या केल्याचं अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वन व्यवस्थापन, पाणी पुरवठा, नागरी वाहतूक, ॲक्वाकल्चर, जैवविविधता संवर्धन, गुंतवणूक प्रोत्साहन, अशा विविध क्षेत्रांमधल्या उपक्रमांना या करारामुळे बळ मिळणार आहे. 

March 27, 2025 9:43 AM March 27, 2025 9:43 AM

views 4

अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यापार भागीदार देश

भारताच्या अमेरिकेसोबत व्यापार संबंध अधिक भक्कम करण्यासाठी गहन चर्चा- परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांची माहिती भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी गहन चर्चा करण्यात येत असून ऊर्जानिर्मितीक्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ आणि स्थिर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.   भारताच्या दूरदर्शी विकासासाठी ते आवश्यक असल्याच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितल. नवी दिल्लीत एशिया सोसायटीतर्फे आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.   अमेरिकेच्...

March 25, 2025 3:27 PM March 25, 2025 3:27 PM

views 8

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर

अमेरिकी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ आज भारताच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते भारतीय अधिकाऱ्यांबरोबर व्यापारविषयक चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनी अनेक देशांमधून येणाऱ्या सामानावर आयात शुल्क लावलं असून त्या संदर्भात दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. यावेळी दोन्ही देशांमध्ये काही व्यापारविषयक चर्चा होऊन काही वस्तूंवरील आयातशुल्कात सवलत मिळण्याची शक्यता आहे. 

March 22, 2025 12:57 PM March 22, 2025 12:57 PM

views 6

भारत आज ‘अर्थ अवर’ पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार

भारत आज ‘अर्थ अवर’ या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार आहे. दर वर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळात ‘अर्थ अवर’चं आयोजन केलं जातं. यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात.   भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणं, स्मारकं, सार्वजनिक- खासगी संस्था, व्यवसाय आणि समुदाय या उपक्रमात एकत्रितपणे सहभागी  होतात. यंदा अर्थ अवरमध्ये जल संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.  ऑस्ट्रेलियात सिडनी इथं  २००७ साली वर्ल्ड वाइड फंड फॉर...

March 20, 2025 3:17 PM March 20, 2025 3:17 PM

views 7

Champions Trophy : भारतीय संघाला ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक

आयसीसी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला क्रिकेट नियामक मंडळानं ५८ कोटी रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी सांगितलं की आयसीसीचं विजेतेपद लागोपाठ मिळवणं ही विशेष कौतुकाची बाब आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईमधे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन विश्वकरंडकावर नाव कोरलं होतं. 

March 19, 2025 10:56 AM March 19, 2025 10:56 AM

views 11

नवी दिल्लीत भारत – नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री डॉ. आरझू राणा देऊबा यांच्यात नवी दिल्ली इथे बैठक झाली. यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला, विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सहकार्यावर आणि लोकांमधील संबंध आणि राजनैतिक देवाणघेवाण वाढवण्यावर चर्चा केली.   भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या रायसीना संवाद 2025 च्या 10 व्या आवृत्तीच्या निमित्ताने ही भेट झाली. मंत्री डॉ. राणा यांनी या बैठकीला 'अत्यंत फलदायी संवाद' असं म्हटलं आहे.

March 17, 2025 8:23 PM March 17, 2025 8:23 PM

views 11

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विविध क्षेत्रांंमधल्या सहकार्याबाबत ५ करार

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन आणि वनसंवर्धन या क्षेत्रांंमधे पाच करार झाले. दोन्ही देशांच्या एईओ अर्थात  अधिकृत आर्थिक परिचालक कार्यक्रमांना मान्यता देणारा करारही यावेळी झाला.     मुक्त व्यापार कराराबद्दलच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाल्याचं दोन्ही देशांनी जाहीर केलं. व्यावसायिक आणि कुशल कामगार उपलब्ध करून देण्याबाबतही वाटाघाटी सुरू झाल्याचं दोन देशांनी सांगितलं. न्यूझीलंड इंडो-पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद...

March 16, 2025 8:15 PM March 16, 2025 8:15 PM

views 12

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी

भारत आणि न्यूझीलंड यांनी आज मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींना प्रारंभ केला. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांची मजबूत पायाभरणी करणाऱ्या एका मोठ्या भागीदारीची सुरुवात यामुळे होत असल्याचं गोयल म्हणाले. दोन्ही देशातला व्यापार सतत वाढत असून एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या काळात त्यानं १ अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडला...

March 14, 2025 2:44 PM March 14, 2025 2:44 PM

views 8

पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला

पाकिस्तानात अलीकडेच झालेल्या रेल्वे अपहरण प्रकरणात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानने केलेला आरोप भारताने ठामपणे फेटाळला आहे. पाकिस्तानने केलेले आरोप निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितलं. ते पाकिस्तानने केलेल्या आरोपांंवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. जागतिक दहशतवादाचं केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत समस्या आणि अपयशासाठी इतरांना दोष देण्याऐवजी त्यांच्या देशात लक्ष घालावं, असंही जैस्वाल म्हणाले.