October 3, 2025 3:21 PM October 3, 2025 3:21 PM
285
भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची आघाडी
भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भारताने १७८ धावांची आघाडी घेतली आहे. अहमदाबादमधे सुरु असलेल्या या सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला. दिवस अखेर भारताच्या २ बाद १२१ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुलनं दमदार फलंदाजी करत शतक पूर्ण केलं. मात्र, जस्टीन ग्रीव्हज्च्या चेंडूवर तो झेलबाद झाला. शुभमन गिल देखील अर्धशतक करून बाद झाला.