July 4, 2025 2:47 PM July 4, 2025 2:47 PM

views 17

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केनिंग्टनमध्ये होणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या महिलांच्या टी20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज केनिंग्टनमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुरुवात होईल. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवून २-० अशी आघाडी घेतली आहे.

July 2, 2025 2:05 PM July 2, 2025 2:05 PM

views 7

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी केला पराभव

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, काल रात्री ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू होईल.

February 7, 2025 8:55 AM February 7, 2025 8:55 AM

views 13

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे.

February 2, 2025 8:09 PM February 2, 2025 8:09 PM

views 18

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १२ षटकात ३ बाद १६१ धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.