November 7, 2025 2:06 PM

views 22

भारत-अमेरिका भागीदारी दृढ करण्यासाठी राजदूत क्वात्रा आणि अमेरिकी मंत्री पॉल कपूर यांची बैठक

भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंबंधात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.   कपूर यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अमेरिका आणि भारत यांच्यातले दृढ संबंध अधोरेखित केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत भेटीवर येण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ...

October 14, 2025 7:24 PM

views 38

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा पुन्हा सुरु

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर २२ ऑगस्ट २०२५ पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही. 

April 16, 2025 9:00 AM

views 21

भारत आणि अमेरिका देशातला व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची आशा

2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना दिली. अमेरिकेने विविध देशांवर लादलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंता आणि संधी दोन्ही आहेत. भारताने व्यापार उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि अमेरिके सोबत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरु आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

August 27, 2024 9:28 AM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात युक्रेन आणि बांगलादेशातल्या परिस्थितीवर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी युक्रेनमधील स्थितीसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यो बायडन यांनी भारत-अमेरिका सर्वंकष जागतिक भागीदारीसाठी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल प्रधानमंत्री मोदींनी यावेळी त्यांची प्रशंसा केली. उभय देशांमधली ही भागीदारी लोकशाही, कायद्याचं राज्य या समान मूल्यांवर आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेल्या परस्पर दृढ संबंधांवर आधारित आहे. या चर्चेवेळी मोदी आणि बायडन यांनी द्विपक्षी संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगती...