January 24, 2026 3:24 PM

views 43

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात चर्चा

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली. २१ आणि २२ जानेवारी रोजी झालेल्या या चर्चेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव पी. एस. गंगाधर आणि यूकेच्या राष्ट्रीय विमा धोरण विभागाचे उपसंचालक एडमंड हेअर उपस्थित होते. या करारामुळे ही दुहेरी आकारणी बंद होईल आणि दोन्ही देशांच्या नागरिकांना फायदा होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.