October 29, 2024 10:22 AM October 29, 2024 10:22 AM

views 5

बडोद्यामध्ये भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

गुजरातमधील बडोदा इथं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीवेळी भारत आणि स्पेन यांच्यात रेल्वे वाहतूक, सीमाशुल्क, आणि गुंतवणुकीशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले. तसंच २०२६ हे वर्ष भारत-स्पेन यांच्यातलं सांस्कृतिक, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून साजरं करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय विषयांवर व्यापक चर्चा केली. शाश्वत ऊर्जा आणि हवामान बदलांशी जुळवून घे...