December 14, 2025 1:35 PM

views 84

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना धरमशाला इथं रंगणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

November 23, 2025 7:01 PM

views 70

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारत अजुनही ४८० धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या ४ गड्यांनी आज धावसंख्येत २५२ धावांची भर घातली. सेनुरान मुथुसामी यानं १०९ धावांची शतकी खेळी केली. तर मार्को यान्सनचं शतक थोडक्यात हुकलं. त्यानं ९३ धावा केल्या. भारताच्या वतीनं कुलदीप यादव यानं सर्वाधिक ४, तर बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्य...