December 21, 2025 2:53 PM

views 25

युक्रेन रशिया युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळानं घेतली रशियन अधिकाऱ्यांची भेट 

युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत, अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडा मध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही चर्चा सकारात्मक होती, आणि ती आजही सुरु राहील, असं  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी बातमीदारांना सांगितलं.  दरम्यान, दोन्ही बाजूंनी ओलीसांची देवाणघेवाण सुलभ झाली, आणि राष्ट्रीय नेत्यांमधल्या बैठकींचा मार्ग मोकळा झाला, तर युक्रेन, अमेरिका आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला पाठिंबा देईल, असं ...

December 6, 2025 9:15 AM

views 20

येत्या पाच वर्षात आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भारत आणि रशियामध्ये सहमती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात नवी दिल्लीतल्या हैद्राबाद हाऊसमध्ये झालेल्या 23व्या वार्षिक शिखर संमेलनात संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील सहकार्यासाठी महत्त्वाचे करार करण्यात आले. भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्याची, तसंच ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची तयारीही रशियानं दाखवली. आर्थिक आणि व्यापारी भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियादरम्यान 2030 पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर यावेळी सहमती झाली.

December 5, 2025 8:12 PM

views 46

२०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती

आर्थिक आणि व्यापारी भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली.    (गेल्या ८ दशकांपासून भारत आणि रशियामध्ये संबंध असून ते अधिकाधिक बळकट होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. दोन्ही देशातल्या आर्थिक सहकार्य करारानं हे संबंध आणखी दृढ होतील असं ते म्हणाले    कृषी आणि खत निर्मिती क्षेत्रा...

December 5, 2025 1:05 PM

views 40

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातउच्चस्तरीय बैठक

भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. याशिवाय व्यापार, वित्त, आरोग्यसेवा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित सामंजस्य करार देखील होणार आहेत.    तत्पूर्वी, तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतिन यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं...

December 5, 2025 9:43 AM

views 45

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

तेविसाव्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतिन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार, आरोग्यसेवा, तसंच आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी म...

December 4, 2025 8:04 PM

views 38

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन नवी दिल्लीत दाखल

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन नवी दिल्लीत पोहोचले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली.   रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागिदार असून, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत लष्कर आणि...

May 5, 2025 7:36 PM

views 20

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळ दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीची बांधिलकी व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी समाजमाध्यमात सांगितलं आहे.