June 29, 2025 7:52 PM June 29, 2025 7:52 PM

views 7

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ – २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर

इंडिया रेटींग अँड रिसर्च या अर्थविषयक संस्थेच्या वतीनं २०२४ - २०२५ या वर्षासाठी जाहीर केलेल्या पत मानांकनात नवी मुंबई महानगर पालिकेला डबल ए प्लस स्टेबल मानांकन जाहीर झालं आहे. नवी मुंबई महानगर पालिकेनं सलग अकराव्या वर्षी हे मानांकन मिळवलं असून, अशी कामगिरी करणारी ती देशातली एकमेव महानगरपालिका ठरली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा, महसूलविषयक जमा आणि खर्चाचा योग्य ताळमेळ, उत्तम कर वसुली, मालमत्ता कर विषयक दिलासादायक योजना अशा बाबींना प्राधान्य दिलेलं असल्यानं...