August 5, 2025 1:08 PM August 5, 2025 1:08 PM

views 4

फिलीपीन्सच्या राष्ट्राध्यक्षांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत

फिलीपीनचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनिअर यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. यावेळी पाहुण्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. मार्कोस यांनी सपत्नीक राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पार्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.   प्रधानमंत्री मोदी आणि फिलीपीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात आज नवी दिल्लीत प्रतिनिधीमंडळस्तरीय बैठक होणार आहे. या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, अ...

August 5, 2025 12:31 PM August 5, 2025 12:31 PM

views 5

प्रधानमंत्री आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड रोमुआल्देझ मार्कोस ज्युनिअर यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा आज होणार आहे. मार्कोस सध्या भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांमधल्या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. मोदी आणि मार्कोस यांच्या उपस्थितीत आज अनेक संयुक्त सहकार्य करारांवरही स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सहकार्य, कृषी, औषधनिर्माण अशा विवि...

August 4, 2025 10:28 AM August 4, 2025 10:28 AM

views 3

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मार्कोस ज्युनियर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचीही ते भेट घेणार आहेत. फिलीपिन्सला परतण्याआध...