January 21, 2025 7:11 PM

views 30

जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी साडे ३ लाख कोटी रुपयांचे करार

दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज एकंदर ३ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.   या कराराअंतर्गत गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्या...