May 18, 2025 8:39 PM May 18, 2025 8:39 PM
14
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ७ सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळं जाहीर
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, सात सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळं लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत. या संदर्भात, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळांचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचा गट सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल. भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा गट यूके, फ्रान्स, जर्मनी, युरोपियन युनियन, इटली आणि ...