January 19, 2025 7:00 PM January 19, 2025 7:00 PM
24
इंडियन ओपन बॅडमिंटन : डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेननं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं
डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेन यानं नवी दिल्लीत झालेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हाँगकाँगच्या सी यू ली याच्यावर २१-१६, २१-८ अशी थेट गेम्समध्ये मात केली. महिला एकेरीत दक्षिण कोरियाची ॲन से यंग अजिंक्य ठरली. तिनं थायलंडच्या पी. चोचुवाँगला २१-१२, २१-९ असं पराभूत केलं.