December 18, 2025 1:18 PM December 18, 2025 1:18 PM

views 19

भारत-ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला नवी दिशा आणि गती देईल – प्रधानमंत्री

भारत - ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते. ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत, अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा पूल म्हणून काम करतो असं प्रधानमंत्री म्हणाले. दोन्ही देशांची मैत्री प्रत्येक काळात मजबूत होत असून हे नातं विश्वासाच्या पायावर उभं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दोन्ही देशातील आर्थिक भागीदारीमुळ...