January 11, 2026 6:26 PM January 11, 2026 6:26 PM
80
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये सुरु
भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यबझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३०० धावा केल्या. डेरिल मिशेलनं सर्वाधिक ८४ धावा केल्या. डेवोन कॉनव्हेनं ५६ तर हेन्री निकोल्सनं ६२ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे मोहमद सिराज, हर्षीत राणा, आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी...