October 14, 2025 8:00 PM October 14, 2025 8:00 PM

views 17

भारत आणि मंगोलियामध्ये द्विपक्षीय चर्चा

भारत आणि मंगोलिया हे दोन्ही देश समान सांस्कृतिक परंपरा, लोकशाही मूल्यं आणि विकासासाठी वनचबद्ध असून दोन्ही देशांचे संबंध विश्वास आणि मैत्रीच्या पायावर उभे असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्यासोबत नवी  दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. गेल्या दशकभरात भारत आणि मंगोलिया यांच्यातली भागीदारी अधिकाधिक दृढ  होत आहे, ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले....

June 1, 2025 1:43 PM June 1, 2025 1:43 PM

views 11

विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू

मंगोलियातल्या उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात भारत-मंगोलियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. कालपासून सुरू झालेला हा सराव येत्या १३ तारखेपर्यंत सुरू राहील. यात भारत आणि मंगोलियातल्या वाढत्या संरक्षण सहकार्याला प्रतिबिंबित करणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सरावसत्राचं उद्घाटन मंगोलियातले भारतीय राजदूत अतुल मल्हारी गोत्सुर्वे आणि मंगोलियाचे मेजर जनरल लखगवासुरेन गान्सेलेम यांच्या हस्ते झालं. दोन्ही मान्यवरांनी सहभागी सैन्यदलांना शुभेच्छा दिल्या.

May 30, 2025 1:25 PM May 30, 2025 1:25 PM

views 8

भारत आणि मंगोलिया दरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं उलानबटार इथं आयोजन

भारत आणि मंगोलियादरम्यान सैन्यदलांच्या सरावाचं मंगोलियाची राजधानी उलानबटार इथं आयोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून १३ जूनपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही दलांदरम्यान परस्पर कार्यपध्दतीचा अभ्यास केला जाणार आहे. नोमॅडिक एलिफंट नावाच्या सरावाचा हा १७ वा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. भारत-मंगोलियादरम्यान हा सैन्यसराव दरवर्षी आयोजित केला जातो.