October 29, 2025 9:13 PM October 29, 2025 9:13 PM

views 41

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या  दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं असून व्यापार आणि बंदरे पायाभूत सुविधांना चालना मिळाली असं प्रधानमंत्री म्हणाले. सरकारनं नौवहन क्षेत्रात सुधारणांसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत, शतकभर जुने कायदे बदलून २१ व्या शतकातले आधुनिक कायद...

October 29, 2025 1:16 PM October 29, 2025 1:16 PM

views 62

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री मुंबई दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. भारत समुद्री सप्ताह २०२५ या नौवहन परिषदेत होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचं अध्यक्षपदही ते भूषवतील.   पाच दिवसांच्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ तारखेला झालं. केंद्रीय बंदरविकास, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या परिषदेला संबो...

October 14, 2025 7:29 PM October 14, 2025 7:29 PM

views 74

इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी मुंबईत कायमचं केंद्र उभारावं – मुख्यमंत्री फडणवीस

भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी इंडिया मेरीटाइम विक २०२५ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत त्यांनी इंडिया मेरीटाईम विकच्या आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवालही यावेळी उपस्थित होते.   मेरीटाइम विक सारख्या कार्यक्रमांसाठी मुंबई हे एक योग्य ठिकाण आहे, असं ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. त्या...