October 30, 2025 2:29 PM October 30, 2025 2:29 PM

views 5

जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताचं पुन्हा वर्चस्व – मंत्री मनसुख मांडवीय

जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. वास्को द गामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षांपासून भारतीय व्यापारी समुद्रमार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते असं ते म्हणाले. अमृतकाळात नौवहन क्षेत्रातल्या भारतीय पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करुन घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.   भारतीय नौवहन क्षेत्रातल्या अग...