November 1, 2025 12:05 PM November 1, 2025 12:05 PM

views 32

भारत-इंग्लंड संबंध आता गतिमान आणि भागीदारीमध्ये विकसित झाले – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

भारत-इंग्लंड संबंध एका गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संबंधापासून गतिमान आणि भविष्यकालीन भागीदारीमध्ये विकसित झाले असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीमध्ये यूके राष्ट्रीय दिन समारंभात ते बोलत होते.   दोन्ही देश कनेक्टिव्हिटी, एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या बाबतीतही एकमेकांना आवश्यक ते सहकार्य करतअसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

August 3, 2025 2:58 PM August 3, 2025 2:58 PM

views 37

भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत

लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल.   भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी आहे.  

June 20, 2025 8:15 PM June 20, 2025 8:15 PM

views 22

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन चषक पाच कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज इंग्लंडमधे लीड्स इथं  हेडिंग्ले मैदानावर सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.    भारताचा धावसंख्या ९१ झाली असताना के एल राहुल ४२ धावांवर बाद झाला, तर त्यानंतर आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. जैस्वालनं शतक, तर गिलनं अर्धशतक पूर्ण केलं आहे.  शेवटची बातमी हाती आल...