May 30, 2025 1:21 PM May 30, 2025 1:21 PM
17
वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल – RBI
चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सरकारचा भांडवली खर्चावर भर, खासगी क्षेत्राची वाढ, बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात वाढ अपेक्षित आहे. यासाठी सरकार सकारात्मक धोरण राबवत असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.