June 3, 2025 1:05 PM June 3, 2025 1:05 PM

views 3

भारत डिजिटल विकासाकरता वचनबद्ध – केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासनी

भारत सर्वसामावेशक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज डिजिटल विकासाकरता वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासनी यांनी म्हटलं आहे. ब्राझील इथं झालेल्या ब्रिक्स देशांच्या अकराव्या दूरसंवाद मंत्रीस्तरीय परिषदेत ते काल बोलत होते. भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचं सर्वसमावेशक आणि परिवर्तनकारी डिजिटल सुशासनाकरता एक जागतिक मापदंड म्हणून सादरीकरण त्यांनी यावेळी केलं. भारतात प्रगत संपर्कव्यवस्था उभारण्यात आधार आणि युपीआयच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची माहिती त्यांनी दिली.