November 12, 2025 1:21 PM

views 29

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारत – क्युबा दरम्यान सामंजस्य करार

भारत आणि क्युबा दरम्यानचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी काल हवाना इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्परांना कायदेशीर सहाय्य करणं, आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याबाबतचे राजशिष्टाचार, याचा यात समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि क्युबाचे कार्यवाह परराष्ट्र मंत्री गेरार्डो पेनालव्हर पोर्टल यांच्या बैठकीदरम्यान हा करार झाला.