January 18, 2026 8:00 PM

views 5

एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३३८ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून, न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, आणि त्यांचे पहिले दोन गडी झटपट बाद केले. त्यानंतर विल यंगही ३० धावांवर बाद झाला. मात्र डेरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी वैयक्तिक शतकं ठोकतानाच चौथ्या गड्यासाठी २१९ धावांची भागीदारी केली. डेरिल मिशेलनं १३७, तर ग्लेन फिलिप्सनं १०६ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला न...