September 13, 2025 3:06 PM September 13, 2025 3:06 PM

views 7

पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद भारतात होणार

पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. इटलीत रोम इथं झालेल्या चौथ्या जागतिक तटरक्षक दल शिखर परिषदेत काल ही घोषणा झाल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं समाज माध्यमांवरून दिली आहे. २०२७ साली भारतात चेन्नई इथं या परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचं आयोजन केलं जाईल. या परिषदेचं भारताला मिळालेलं यजमानपद म्हणजे सागरी क्षेत्राचं नेतृत्व करण्याच्या दिशेनं भारताच्या प्रगतीमधला महत्वाचा टप्पा असल्याचं भारतीय तटरक्षक दलानं म्हटलं आहे.   दरम्यान, रोम इथं झालेल्या चौथ्या परिषदेत भारतास...