October 3, 2025 9:11 PM October 3, 2025 9:11 PM
13
भारत-चीन दरम्यान थेट विमानसेवा!
भारत आणि चीनदरम्यान थेट विमानसेवा या महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू करायला दोन्ही देशांनी स्वीकृती दिली आहे. दोन्ही देशांमधल्या ठराविक शहरांमधून ही थेट विमानसेवा उपलब्ध असेल. भारत आणि चीनमधले संबंध पुन्हा सामान्य करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमधला संपर्क वाढेल आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याला मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.