August 20, 2025 9:47 AM August 20, 2025 9:47 AM
4
भारत-चीन या देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा
सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. 'भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक, जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील', असं प्रधानमंत्री मोदी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी भारत-चीन सीमेवर उभय देशांनी शांतता आणि स्थैर्य राखण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आणि सीमाप्रश्न निष्पक्ष, वाजव...