November 12, 2025 3:25 PM November 12, 2025 3:25 PM
37
भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले
भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी आज भूतान नरेश जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांच्यासह आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं उद्घाटन केलं. हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या दौऱ्यात त्यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यां...