January 3, 2026 2:03 PM

views 19

भारत आणि बांगलादेश यांच्यातली नियोजित क्रिकेट मालिका सप्टेंबरमध्ये रंगणार

भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या वर्षी नियोजित असलेली मर्यादित षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका यावर्षी सप्टेंबर महिन्यात होईल, असं बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितलं आहे. मात्र याचं वेळापत्रक निश्चित नाही. गेल्यावर्षी बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारानंतर प्रधानमंत्री शेख हसिना भारतात आल्या, त्यानंतर दोन्ही देशा दरम्यान तणाव वाढला. दोन्ही देशांनी परस्परांच्या उच्चायुक्तांकडे परस्परांच्या देशातल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. या परिस्थितीमुळे दोन्ही देशां दरम्यान होणारी क्रिकेट मालिका ...

November 26, 2025 7:50 PM

views 15

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू – केंद्र सरकार

बांग्लादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बांग्लादेशाच्या नागरिकांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत म्हणाले.    अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीननं कितीही नकार देण्याचा प्रयत्न केला तरी ही वस्तुस्थिती बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अरुणाचल प्रदेशातल्या महिलेला चीननं विमानतळावर अडवून ठेवल्याप्रकरणी ते बोलत होते. या ...

September 30, 2024 1:55 PM

views 17

भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशाचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. चौथ्या दिवशी बांगलादेशनं पहिल्या डावातल्या १०७ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. तत्पूर्वी, काल तिसऱ्या दिवसाचा खेळ मैदान ओलं असल्यामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करावा लागला, तर दुसरा दिवस मुसळधार पावसामुळे पाण्यात गेला. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-० नं आघाडीवर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या नाबाद २९ धावा झाल्या होत्या.