August 8, 2024 10:52 AM August 8, 2024 10:52 AM

views 12

भारत – श्रीलंका अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव

श्रीलंकेकडून काल ओडीआय मालिकेमद्धे तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामाना करावा लागला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारतासमोर 249 धावांच आव्हान ठेवलं होतं परंतु 138 धावांमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पहिला सामना बरोबरीत संपल्यानंतर दूसरा सामना श्रीलंकेनं 32 धावांनी जिंकला. 27 वर्षांनंतर श्रीलंकेला भरताविरुद्धची ही मालिका आपल्या नवे करण्यात यश आलं आहे.

August 3, 2024 2:42 PM August 3, 2024 2:42 PM

views 7

भारत आणि श्रीलंकेतला 50 षटकांचा पहिला क्रिकेट सामना ठरला बरोबरीचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेच्या वतीनं पथुम निसंका आणि दुनिथ यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताच्या अर्शदीप आणि अक्सर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.   विजयासाठी २३१ धावांचा पाठलाग करताना भारतानं ७५ धावांची दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताचा संपूर्ण संघ ४८व्या षटकात २३० धावांमध्येच माघारी परतला. ...