October 17, 2025 2:55 PM October 17, 2025 2:55 PM

views 14

नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात कमांडरांची परिषद

हवाईदलातल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं. त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी आज सांगितलं. नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्या परिषदेत ते बोलत होते. तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद होती.