November 16, 2025 2:21 PM
34
देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू
देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमधे किमान १० जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. झाशीहून येणारी फॉर्च्युनर कार, वाळून भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्यानंतर कारमधले ५ जण जागीच मरण पावले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बडगाम इथं काल झालेल्या अपघातात किमान चारजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व...