January 18, 2026 1:34 PM

views 45

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज इंदूर इथं सुरु झाला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक – एकनं बरोबरीत आहेत.

January 17, 2026 6:13 PM

views 6

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा सरकारचा उपक्रम

देशातल्या गोड्या पाण्यातल्या तसंच खाडीमधल्या डॉल्फिनची मोजणी करण्याचा उपक्रम  सरकारने हाती घेतला आहे. प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दोन टप्प्यात हे सर्वेक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात गंगा नदीच्या मुख्य प्रवाहात म्हणजे बिजनौर ते गंगासागर आणि सिंधु नदीच्या खोऱ्यात हे सर्वेक्षण होईल तर दुसऱ्या टप्प्यात ब्रम्हपुत्रा,  गंगेच्या उपनद्या तसंच सुंदरबन आणि ओदिशात हे सर्वेक्षण होईल.  पर्यावरण, जंगले आणि हवामान बदल मंत्रालयाने ही माहिती दिली. डॉल्फिन्सच्या प्रजातींची संख्येचा या संर्वेक्षणातून अंदाज येईल आण...

January 17, 2026 1:49 PM

views 15

इराणमधले भारतीय नागरिक मायदेशी परतले

इराणमधल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक काल भारतात परतले. भारतीय नागरिकांनी इराण सोडावं, असं आवाहन सरकारने केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांनी परतायला सुरुवात केली आहे. भारत सरकार इराणमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे.

January 8, 2026 3:11 PM

views 49

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी

केंद्र सरकारनं जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशातली  सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरांची गणना करण्यात येईल.   त्या आधीचे १५ दिवस नागरिकांना स्वतःहून या घरांच्या गणनेची माहिती देता येईल. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्येची गणना होईल. मोबाइल अॅपद्वारे केली जाणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.

January 8, 2026 1:10 PM

views 15

SriLanka: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा, लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याशिवाय संरक्षण सहकार्य, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण क्षेत्रातलं सहकार्य याबाबत जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री, संरक्षण सचिव यांच्याशीही चर्चा केली.

January 8, 2026 9:29 AM

views 18

दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा भारत आणि इस्रायलचा पुनरुच्चार

भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारी आणखी सक्षम करण्याविषयी विचारविनिमय केला. या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांनी सामायिक लोकशाही मूल्यं, परस्पर विश्वास आणि दूरदृष्टीच्या आधारावर भारत-इस्रायल सामरिक भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी सामायिक प्राधान्यक्रम निश्चित केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवी...

December 21, 2025 1:30 PM

views 226

१९ वर्षांखालील क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून  प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय

भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीवीर समीर मीनहास यानं दमदार शतकी खेळी करत, आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्यासोबत ९१, तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्यासोबत १३७ धावांची भागिदार...

December 20, 2025 2:56 PM

views 51

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध T20 क्रिकेट मालिकेत भारत विजयी

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं ३-१ अशी जिंकली. अहमदाबाद इथं काल झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघानं २० षटकांत २३१ धावा केल्या. तिलक वर्मानं ७३ तर हार्दिक पांड्यानं ६३ धावा केल्या. हार्दिक पांड्यानं केवळ १६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. विजयासाठी आवश्यक २३२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत २०१ धावा करू शकला. वरुण चक्रवर्तीनं पाहुण्या संघाचे चार फलंदाज बाद केले. हार्दिक पांड्या सामना...

December 18, 2025 8:07 PM

views 30

प्रधानमंत्र्यांच्या ओमान भेटीदरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या

भारत आणि ओमानमधे व्यापक आर्थिक भागीदारी करार आज झाला.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ओमान भेटीत मस्कत इथं आज काररावर स्वाक्षऱ्या झाल्या. उभय देशांच्या संबंधांमधला हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या करारानुसार, भारताच्या कापड, चामडं, पादत्राणं, रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी उत्पादनं, प्लास्टिक, फर्निचर, शेती, औषध उत्पादन, वैद्यकीय उपकरणं आणि ऑटोमोबाईल उत्पादनांना ओमानच्या ९८ टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ लाईन्सवर शून्य सीमाशुल्क आकारलं जाईल. भारताच्या एकूण निर्यात मूल्यामध्ये याचा ९९ टक्क्यापेक्षा जास्...

December 14, 2025 1:35 PM

views 84

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना धरमशाला इथं रंगणार

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघादरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.