August 15, 2024 1:39 PM August 15, 2024 1:39 PM
16
भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी केलं अभीष्टचिंतन
भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी अभीष्टचिंतन केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंध विस्तारत असल्याचं आपल्या शुभेच्छासंदेशात म्हटलं आहे. इस्राएलने ही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इस्राएलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी हर घर तिरंगा अभियानातही भाग घेतला. अमेरिकेतही भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून न्यूयॉर्क शहरात ४ चित्ररथांसह भव्य संचलन होणार आहे. प्रसिद्ध एम्पायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई क...