August 15, 2025 9:49 AM August 15, 2025 9:49 AM
8
राष्ट्रपतींचं देशवासीयांना संबोधन
युवा, महिला आणि मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या व्यक्ती देशाला अमृत काळात आघाडीवर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासीयांना संबोधित केलं. सामाजिक क्षेत्रातले विविध उपक्रम तसंच समग्र आर्थिक विकासामुळं २०४७ पर्यंत विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांचं आयुष्य, व्यापार-उद्योग सहज-सोपे व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असं राष्ट्रपतींनी यावेळी नम...