December 18, 2024 7:44 PM December 18, 2024 7:44 PM

views 15

आयकर विभागाचं १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन

चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं कालपर्यंत १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन केलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, या वेळी त्यात २० पूर्णांक ३२ शतांश टक्के वाढ झाली आहे.  आयकर विभागानं त्यानंतर ३ लाख ३८ हजार कोटी रुपये परतावा म्हणून दिले आहेत. त्यामुळे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १५ लाख ८२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून त्यात १६ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे. 

October 11, 2024 8:38 PM October 11, 2024 8:38 PM

views 15

प्राप्तीकर विभागाकडे आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल जमा

चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल मिळवला आहे. यात ७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६ लाख कोटी रुपये कॉर्पोरेट प्राप्तीकराचा समावेश आहे. कालपर्यंत प्राप्तीकरखात्यानं सुमारे दोन लाख ३१ हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. निव्वळ करमहसुलात १८ टक्के म्हणजे सुमारे सव्वाअकरा लाख कोटी रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.

August 22, 2024 1:05 PM August 22, 2024 1:05 PM

views 2

करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा सोपी बनवण्याचं अर्थमंत्र्यांचं प्राप्तीकर विभागाला आवाहन

करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटिसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या १६५ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ७२ टक्के करदात्यांनी जुन्या कर प्रणालीऐवजी नवीन कर प्रणालीचा स्वीकार केला असून करप्रणाली चेहराविरहित असल्यानं करदात्यांचा विश्वास संपादन केला आहे, असंही ...