September 20, 2025 3:31 PM September 20, 2025 3:31 PM

views 28

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधीकरण महत्त्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण आपल्या स्थापनेपासून गेल्या चार वर्षांपासून हे काम अव्याहतपणे करत आहे, असं सांगत न्यायाधीकरणाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   न्यायाधीकरणाचा निकाल योग्य असला तर...

August 12, 2025 7:24 PM August 12, 2025 7:24 PM

views 11

१८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं मुंबईत उद्घाटन

भारतात परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करत होते. भारतीय अनेक शतकांपासून अवकाशाचं निरीक्षण करत आले आहेत.   पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला, पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते हे त्यांनीच सांगितलं, याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आवर्जून केला. व...

August 3, 2025 3:28 PM August 3, 2025 3:28 PM

views 3

राष्ट्रीय महामार्ग विकासाला गती, मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशात मंगलागिरी इथं ५ हजार २३३ कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या २७२ किमी लांबीच्या २९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर गडकरी काल बोलत होते.   गेल्या अकरा वर्षात राष्ट्रीय महामार्गांची लांबी १२० टक्क्यांनी वाढली आणि २०१४ मध्ये असलेले ४ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्...

May 10, 2025 8:19 PM May 10, 2025 8:19 PM

views 19

मुंबईतील गोखले पूलाचे उदघाटन पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

मुंबईत अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी होणार आहे.   पश्चिम उपनगरातली वाहतूककोंडी फोडणारा हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं खुला झाल्यानं या भागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.