May 17, 2025 1:40 PM May 17, 2025 1:40 PM
9
आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन
जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. उच्च रक्तदाब आणि त्याचे विविध अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसंच उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रित करा आणि दीर्घायुषी व्हा’ ही या वर्षीची संकल्पना आहे. उच्च रक्तदाबाला धोकादायक ठरवणारी बाब म्हणजे या आजाराची कोणतीही खास लक्षणं नाहीत. त्यामुळे यातून हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणं, स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्य...