January 2, 2025 9:51 AM

views 11

वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. डीएपी, अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा तसच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीकविमा योजनेला 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना याबद्दल मा...