November 29, 2025 1:34 PM November 29, 2025 1:34 PM
23
IMOच्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड
२०२६-२७ साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात IMO च्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड झाली आहे. काल लंडन इथं झालेल्या IMO असेम्ब्लीच्या ३४व्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक सहभाग असलेल्या दहा देशांच्या श्रेणीमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजे १६९ वैध मतांपैकी १५४ मते मिळाली. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या बद्दल आनंद व्यक्त केला. हा भारताच्या सागरी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. ...