March 27, 2025 6:57 PM March 27, 2025 6:57 PM
11
LokSabha : स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक मंजूर
व्यवसाय, शिक्षण, संशोधन, पर्यटन आणि आरोग्यासाठी देशात येणाऱ्यांचं स्वागत आहे. मात्र देशाला धोका निर्माण करू इच्छिणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. लोकसभेत स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयकावरील चर्चेला ते उत्तर देत होते. हे विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे देशाची सुरक्षा मजबूत होईल, अर्थव्यवस्था आणि व्यवसायाला चालना मिळेल याशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला चालना मिळेल असं ते म्हणाले. यामुळे भारतात येणाऱ्या प्रत्येक व...